VICE PRINCIPAL'S ADDRESS
प्रा. गोविंद बा. शिंदे
उपप्राचार्य, अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालय, वसई.
विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक मानव्य, केदारनाथ मल्होत्रा वाणिज्य व ई. एस. अँड्राडिस विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.
‘सा विद्या या विमुक्तये’ या विष्णू पुराणातील उक्तीचा खरा अर्थ वसईचे थोर लोकनेते स्वर्गीय अण्णासाहेब वर्तक यांनी ओळखला आणि त्यांचे सुपुत्र स्वर्गीय पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांनी या परिसरातील लोकांना सर्व समस्यांतून मुक्त करण्यासाठी, विद्यार्जन सोपे व्हावे आणि गोरगरीब तसेच स्त्रियांना अत्यल्प दरात शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी १९७१ मध्ये वसईत या महाविद्यालयाची स्थापना केली. कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १९७६ मध्ये झाली.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आज विशाल वृक्षात रूपांतर झालेले आहे आणि त्याची गोड फळे दरवर्षी हजारो विद्यार्थी चाखत आहेत. उच्च दर्जाचे, सर्वांना परवडेल असे, आनंददायी वातावरणात शिक्षण देणे हे कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रमुख म्हणून मी माझी प्राथमिकता समजतो आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना यासाठी प्रवृत्त करतो.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. उदा. महाविद्यालयाचा सुसज्ज असा जिमखाना आहे. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत असतात. त्याचबरोबर N.S.S. , N.C.C., सांस्कृतिक विभाग आहेत . यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर विविध कार्यक्रमात भाग घेता येतो व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो . म्हणूनच अण्णासाहेब वर्तक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक प्रयत्नशील असतात . महाविद्यालयात कार्यरत असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आमच्या शिक्षण संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्टे यांना सुसंगत आचरण ठेवल्यामुळे आमचे विद्यार्थी देश-विदेशात तसेच समाजात विविध ठिकाणी महत्त्वाची पदे भूषवीत आहेत.
या वाटचालीत माझा आणि माझ्या प्रत्येक सहकार्याचा खारीचा वाटा आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थक अभिमान आहे. उत्तरोत्तर आमची संस्था अधिकाधिक लोकप्रिय आणि समाजाभिमुख होईल यात काही शंका नाही.
प्रा. गोविंद बा. शिंदे
उपप्राचार्य, अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालय, वसई.